Skip to content

एकमेकांना शारीरिक सुख देऊ न शकणारी जोडपी आणि यावर उपाय.

एकमेकांना शारीरिक सुख देऊ न शकणारी जोडपी आणि यावर उपाय.


सोनाली जे


आपली पुरुष प्रधान संस्कृती , संस्कार यांचा आपल्यावर असणारा पगडा असतो आणि बरेचदा लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर ही मुला – मुलींना किंवा जोडप्यांना म्हणले तरी चालेल, शारीरिक सुख म्हणजे नेमके काय , ते कसे करायचे , त्याकरिता केवळ शरीर एकत्र येवून चालत नाहीत तर मन ही एकत्र यावी लागतात. याची माहिती नसते. आणि आधी जर स्वभाव समजले , आवडी निवडी समजल्या तर त्यानुसार आधी मने जुळण्यास मदत होते. मनाने एकत्र आलात की हळूहळू शरीर ही तेवढेच मोकळेपणाने साथ देवू लागते.

एकमेकांना शारीरिक सुख देवू न शकणारी जोडपी याची कारणे ही भिन्न असतात. ती कारणे आणि उपाय बघू.

१. शारीरिक कमतरता : –

नवीन असताना जोडप्यांना आधी एकत्र येण्या मधली भीती वाटत असते. हे पहिले अनुभव असतात ..कसे जमेल पासून , एकमेकांना कसे आणि कोणत्या पद्धतीने शारीरिक सुख द्यायचे या बद्दलचे अज्ञान , घरातल्या मोठ्या व्यक्ती किंवा बरोबरच्या व्यक्ती यांचे यात अनेकवेळा मार्गदर्शन मिळत नाही कारण अजून आपल्या इकडे भारतात तेवढ्या मोकळेपणाने या विषयावर चर्चा , बोलणे होत नाही.

त्याच मुळे सुरुवातीला जोडपी जे काही प्रयत्न करतात त्यात ते चुकीचे , बरोबर किंवा काही कमतरता हे ही समजत नाही. आणि त्यावर जोडपी मोकळेपणाने एकमेका सोबत बोलत नसतील तर अजूनच त्रास .

शारीरिक सुख देताना जोडप्या मध्ये कोणालाही काही शारीरिक त्रास असेल , काही उणीवा , कमतरता जाणवत असतील तर ताबडतोब कोणताही संकोच न बाळगता तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तो उपचार सुरू करावेत. त्या करिता वेळ ही द्यावा.

अनेकदा काय होते की डॉक्टरांचा सल्ला किंवा योग्य ते उपचार घेणे हे समजले नाही तरी आहे तसेच चालू ठेवायचे . कधी मग गरजपूर्ती करिता असेल तर कधी उमेद आशा ठेवून की काही तरी बदल घडतील , कधी कधी निराशेने जे आहे ते तसेच असते असे समजून .आहे तसेच चालू ठेवणे यातून निराशा येते. एकमेकांविषयी गैरसमज निर्माण होतात, दुरावा निर्माण होतो.

तर कधी आपल्यात काही कमतरता आहे याचाच स्वीकार जोडपी करू शकत नाहीत. त्यामुळे आहे तसेच सुरू राहते आणि एकमेकांना सुख देवू शकत नाहीत. त्यापेक्षा तेवढे मोकळेपणा ठेवून , एकमेक संवाद साधून , कधी बरोबरच्या मित्र मैत्रिणी ,बहिणी , भावू यांची मदत घेवून तुम्ही योग्य guidance घेवू शकता. त्यांचे अनुभव ही तुम्हाला मदत करू शकतात.

२. संकोच : लाज , वडीलधाऱ्या मंडळींचा आदर :

काही वेळेस घरात वडीलधारी मंडळी , मुले असतात त्यातून थोडी बंधने येतात. मोकळीक न मिळता संकोच वाढतो. आणि त्याचा ही परिणाम जोडप्यांमध्ये शारीरिक सुखावर होतो .

यावर उपाय काय ? तर या सगळ्या जबाबदाऱ्या या कायमस्वरूपी च आहेत.. पण त्यातून एकमेकांच्या करिता वेळ काढा , दोन दिवस सहल , निसर्गरम्य ठिकाणी जा , अगदीच शक्य नसेल तर दिवसभर काढा , movie , बाहेर फिरायला जा. आवडत्या गोष्टी करा. त्यातून मोकळेपणा निर्माण होईल जो मन आणि शारीरिक सुख या दोन्ही दृष्टीने शांत करेल. सुख देईल. आनंदी ठेवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल .

३. एकमेकांच्या शारीरिक गरजा समजून घ्या :

एकमेकांच्या शारीरिक आणि मानसिक गरजा समजून घ्या. भावना समजून घ्या. आणि त्याप्रमाणे एकमेकांच्या मध्ये बदल घडवून आणा. तर सहजीवन सुखाचे आणि समजून घेवून आनंदी होईल.

४. सोशल मीडिया , पॉर्न व्हिडिओज , you tube इतर अनेक साईट्स, ॲप बघुंन तशा अपेक्षा वाढतात. पण ते जसे दाखवतात तसे प्रत्यक्षात शक्य नाही होणार हे लक्षात घेवून अपेक्षा ठेवाव्यात. शिवाय कधी खरेच थोड्या फार प्रमाणात गरज असेल तर नक्की या गोष्टींची मदत ही घ्यावी.

५. एकमेकांच्या मधले आकर्षण वाढविण्याकरिता प्रयत्न करावेत :

आकर्षक ड्रेस, रंगसंगती , कधी वातावरण सुगंधित करणारा परफ्यूम असेल , अत्तर असेल , एखादा मोगर्याचा गजरा असेल , गुलाबाचे फुल . कधी एकमेकांना surprise gift देवून , कधी ऑफिस मधून लवकर येवून , कधी बायको ला ही नवऱ्याने गरम गरम मस्त चहा देवून ..एकमेकांची साथ देवून , एकमेक किती महत्वाचे आहेत , कधी secure feel होण्याकरिता तसे जाणवून देवून , असे प्रयत्न करावेत जे तुम्हाला एकमेकांच्या जवळ घेवून येतील आणि शारीरिक सुख ही उत्तम होईल.

६. Past experience :

पूर्वी एखादा दोघांच्या मधला वाईट अनुभव असेल , कधी एकत्र असताना शारीरिक दुखापत झाली असेल , किंवा त्रास झाला असेल तर किंवा आधी कधी समाधानी अनुभव नसेल तर त्याचा परिणाम पुढच्या वेळी जवळ येताना होतो. पूर्वी सारखेच होईल ही मानसिक धास्ती निर्माण होते त्यामुळे ही एकमेकांना शारीरिक सुख देण्यात कमी पडतात.

असे past experience विसरून जावेत ..accident होता असे समजून पुढे चांगलेच अनुभव घ्यायचे आहेत असे positive विचार करून मागचा अनुभव लक्षात घेवून तसे होणार नाही याची काळजी घेवून शारीरिक सुखावर लक्ष केंद्रित केले तर खरेच जोडपी आनंदी आणि
एकमेकांना शारीरिक सुख देऊन जोडपी जीवनाची यशस्वी वाटचाल करतील.

७. पुढाकार कोणी घ्यायचा :

बर्याच स्त्रीया या अजून ही मर्यादा पळून असतात. लज्जा , थोडा बुजरेपणा यामुळे पुढाकार घेत नाहीत. काही वेळेस पुरुष ही पुढाकार घेत नाही तेव्हाही एका कोणाला जरी इच्छा असेल तरी दुसरा पुढाकार घेत नाही म्हणून ही शारीरिक सुखपासून दूर राहण्याची वेळ येते. तर कधी एखाद्याची इच्छा नसताना जर जोडीदाराने force केला तरी ते एकमेकांना शारीरिक गरज पूर्ण करू शकले तरी सुख देवू शकत नाहीत. म्हणून दोघांनी ही फ्रेश , प्रसन्न , उत्साही राहावे.

८. व्यायाम , योगा , प्राणायाम :

आपला शारीरिक फिटनेस वाढण्याकरिता , आपल्याला फ्रेश राहण्याकरिता , उत्साहित ठेवण्याकरिता शरीर स्वास्थ्य आणि मन: स्वास्थ्य ही वाढविण्याकरिता व्यायाम , योगा , प्राणायाम यांचा वापर होतो . शरीर आणि मनाची उत्तम साथ असेल तर शरीर सुख ही उत्साहाने देणे आणि घेणे होते. आणि शरीराच्या मर्यादा राहत नाहीत.

९. भावनिक समजून घेणे :

एकमेकांच्या भावना समजून घेणे अत्यंत गरजेचे असते. एकमेकांना प्रेम द्या ..घ्या.., संवादाची देवाणघेवाण करा, राग , चिडचिड , भांडणे करू नका , आवाज चढवून बोलू नका,

जर सतत हिडीस फिडीस करून बोलले तर भावना दुखावतात. आणि बरेचदा नकारात्मकता येते. आणि मग त्याने / तिने मला असे वागविले , असे केले या विचारांनी मी का मग शारीरिक सुख देवू हा नकारात्मक भाव तयार होतो तर कधी कधी ही नकारात्मक वृत्ती एकमेकांना जवळ येण्यात आडवी येते. त्रासदायक ठरते. त्यामुळे मन आणि शरीर हे एकरूप होवू शकत नाहीत आणि मग शारीरिक सुखापासून ही वंचित राहतात.

म्हणूनच एकमेकांच्या भावना जपणे , चार चौघात respect देणे , समाजात ही एकमेकांविष्यी मान ठेवणे गरजेचे असते. त्यातून भावनिक समाधान मिळाले तर शारीरिक सुख ही चांगले देवू शकतात. आयुष्य सुंदर आहे. एकमेकांना समजून घ्या. प्रयत्न करा. आयुष्यावर आणि जोडीदारावर भरभरून प्रेम करा. सगळ्या गोष्टींवर उपाय असतात हे लक्षात घ्या आणि तसे प्रयत्न करा.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “एकमेकांना शारीरिक सुख देऊ न शकणारी जोडपी आणि यावर उपाय.”

  1. My partner is getting her needs fulfiled from her boyfriend older than 60 yrs.
    How to stop

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!