Skip to content

स्वतःची ‘Life’ स्वतः जगा.. नाहीतर त्यावर इतरांची जबरदस्ती होईल.

स्वतःचं ‘Life’ स्वतः जगा.. नाहीतर त्यावर इतरांची जबरदस्ती होईल.


सोनाली जे.


ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला..

एक प्रसिद्ध गीत आपल्या सर्वांना माहिती आहेच.
दिल तडप तडप के कह रहा है, आभी जा !
प्रेमातली , भेटण्यातली ही हृदयाची तळमळ जाणंविते ना !!!

आपली तळमळ कोणासाठी होत असत ?? आपण आपले मानतो त्याच लोकांच्या करिता ना . आपल्याच लोकांच्या बोलण्याची , आपलेपणा ने वागण्याची. आपल्याला एखादी गोष्ट त्यांनी करावी अशी तळमळ असते. पण हेच परक्या माणसाने कसेही वागल तर आपण त्याला काही सांगायला जातो का?आपली तळमळ होते का ? नाही ना !! किंवा तिकडे आपले लक्ष ही जात नाही.

आपण आपल्या ज्या खूप जवळच्या लोकांच्या बरोबर असतो त्यांच्या बरोबर आपले विचार शेअर करतो, सल्ले देतो, कधी रागावतो , कधी चिडतो , कधी अपेक्षा ठेवतो . जसे आपण आपल्या मुलांच्या प्रगतिकरिता त्यांनी अभ्यास करावा म्हणून आपली तळमळ होत असते . त्यातून आपण मुलांना समजावून सांगतो , नाही ऐकल तर रागावतो , तरी ही नाही ऐकले तर ओरडतो . चिडतो. कधी कधी तरी ही नाही ऐकले तर परत परत तळमळीने सांगत असतो. हेतू काय असतो तर त्यांच भले व्हावे.

चायना मधले तीन भिक्षुक असतात. ते तिघेही कायम हसत असतात. आणि वेगवेगळ्या गावी , देशो देशी जावून तिथल्या सर्व लोकांना त्यांच्या बोलण्यातून , वागण्यातून हसवत असतात. त्या गावातले लोक हसायला शिकले की पुढचे गाव असे ते फिरत असतात. हळूहळू ते भिक्षुक वयस्क होवू लागतात. तरी ही ते आनंदी आणि कायम हसत असतात. एके दिवशी त्यातला एक भिक्षुक मृत्यू पावतो.

तरी ही हे उरलेले भिक्षुक हसत असतात. ते बघून सर्व गाव आणि तिथले वडीलधारी कुजबुज करू लागतात. हे कसले मित्र म्हणायचे. तिघे कायम एकत्र असतं . तेव्हा गावाला हसवत . पण आता तो गेला तरी यांना दुःख नाही , त्याच्या विषयी तळमळ नाही . हे हसतच आहेत. त्यातल्या त्यात जे गावातले वडीलधारी असतात ते त्या भिक्षूंना विचारतात की असे कसे काय ? तुम्ही रडायचे, दुःख करायचे सोडून., तुमचा रोजचा मित्र , तुम्ही सगळे मिळून इतरांना हसवत आलात तर त्या मित्राच्या जाण्याबद्दल तळमळ पाहिजे होती आणि तो व्यक्त करायची सोडून तुम्ही हसत का आहात ?

तर ते दोघे भिक्षुक म्हणतात , आम्ही सगळीकडे एकत्र जायचो , लोकांना हसवत होतो , अनेक वर्ष आम्ही एकत्र होतो पण आमच्यात शर्यत तोच जिंकला तोच आधी गेला आणि तो जिंकला म्हणून आम्ही हसत आहोत.

चीन मध्ये नियम असतो की मृत व्यक्तीच्या अंत्य संस्कार करण्यापूर्वी त्याच्या अंगावरील वस्त्रे काढून टाकून त्याला आंघोळ घालून नवीन कपडे घालत. पण या भिक्षुक असतो त्याने त्याचे जुने कपडे तसेच ठेवायचे असे सांगितले असते. त्याने आंघोळ ही केली आहे . आणि त्याचे शरीर मलिन नाही. त्यामुळे आंघोळ ही घालायची नाही असे सांगितले असते.

संपूर्ण गाव अंत्यविधी करिता आलेला असतो.. सगळे दुःखी असतात. त्याच्या करिता तळमळ असणारी लोक हळहळत असतात.
अंत्यविधी सुरू होतो आणि तो गेलेला भिक्षुक त्याच्या शरीरातून एकदम फटाके उडू लागतात. अख्खे गाव हसायला लागते. त्यांच्या सोबत त्याचे हे दोन भिक्षुक मित्र ही खो खो हसत होते.

त्यांना हसू येत होते कारण या आपल्या मित्राने आयुष्यभर लोकांना हसविले आपल्या मरणा नंतर होणारी त्यांची तळमळ त्याने आधीच ओळखली होती आणि त्याने मरताना आपल्या कपड्यात फटाके लपविले होते. आणि जेव्हा ते फटाके उडायला लागले. तेव्हा अख्खे गाव हसत होते. म्हणजे मेल्यावर ही लोकांना त्याने हसतच ठेवले होतें. हाच तर मोठा आयुष्याचा धडा देवून गेला ना हा भिक्षुक की, कोणासाठीही आपलं आयुष्य तळमळू देऊ नका !!

आपण ही आपल्या दैनंदिन आयुष्यात उगीच च तळमळत असतो. कधी कोणी आपल्या मनासारखे वागावे म्हणून , तर कधी खूप वेळा सांगून ही ऐकत नाही म्हणून होणारी तळमळ असते. तर कधी आपल्याकडे हेच नाही तेच नाही , काहीच मनासारखे होत नाही म्हणून तळमळत असतो. तर कधी दुसऱ्याशी तुलना करून की त्याच्याकडे / तिच्याकडे हे आहे , माझ्याकडे नाही.

तर कधी ९९ डॉलर्स story सारखे जे आहेत ९९ डॉलर्स त्याची किंमत च नाही तर १०० डॉलर्स मधला जो एक डॉलर नाही त्याकरिता आपण सतत तळमळत असतो.

तर कधी आपले मित्र _मैत्रिणी हळूहळू त्यांचे वेगळे विश्व होत जाते मग ते दूर जातात म्हणून तळमळ तर कधी आपल्या जवळच्या नात्यात ,रिलेशनशिप मध्ये आहेत त्या आणि घालवलेल्या चांगल्या दिवसांची , क्षणांची कदर नाहीच पण जे करू शकलो नाही तेच धरून बसून नाही झाले , नाही करू शकलो त्याचीच तळमळ.

आर्थिक गोष्टी इतरांकडे पैसे.गाडी बंगला आपल्याकडे नाही , भौतिक गोष्टी .आपला मोबाईल साधा , गाडी नाही , घर नाही, ब्रँडेड वस्तू नाहीत , आणि हे पाहिजे तर हे करू शकलो असतो .हे नाही म्हणून हे करू शकत नाही . याचीच तळमळ असते . पण खरेच ज्यांना कोणत्याही परिस्थिती मध्ये एखादी गोष्ट करण्याची जिद्द आहे. तयारी आहे त्यांना कसलीच तळमळ नसते.

कोणतीच वस्तू पहिल्या सारखीच राहणारी , कायम स्वरुपी टिकणारी नाही .प्लास्टिक असेल त्याची मजबुती हळूहळू कमी होणार. लोखंड हळूहळू गंजणार. वस्त्र वापरून वापरून , धुवून जीर्ण. होणार.

नाती ही तसेच एकमेकांचे स्वभाव समजल्यानंतर , काही वेळा समजून घेतल्यावर कधी कधी समजून ही घेणारी तर, कधी समजून घेण्याची मानसिकता संपल्यावर कधी थोडेसे अंतर ठेवून वागणारी पण वेळ प्रसंगी साथ देणारी , तर कधी दुरावा निर्माण करणारी तर कधी अलिप्त करणारी. त्यामुळे आपण किती ही तळमळत राहिलो दुसऱ्याकरीता , वस्तू करिता तरी नैसर्गिक बदल हे होतच जाणार .

आयुष्य सुंदर आहे. पुढं जात असताना जे आहे त्याचा स्वीकार करा. एकमेका करिता कळकळ असू द्या. पण
कोणासाठीही आपलं आयुष्य तळमळू देऊ नका !!

 


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!