जगण्याचा त्रास व्हायला लागला की जगण्यात रस राहत नाही..
सौ. मयुरी महेंद्र महाजन
पुणे (चिंतामणी चौक)
मानसशास्त्राचा अभ्यास करत असताना लक्षात आले की जन्मतः माणसांमध्ये जीवन उर्मी आणि मृत्यू उर्मी असतातचं… फरक फक्त इतकाच असतो की जेव्हा जगण्यामध्ये आनंदाची अनुभूती होते… आनंद वाटत असतो सुख वाटत असते तेव्हा मानवात जीवन ऊर्मीचा संचार असतो आणि जेव्हा मानवाच्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडत जातात… आयुष्यात येणारे दुःख संकट पेलेनासे होतात नको नको वाटत जाते… तेव्हा जीवनाबद्दल व्यक्तीला कुठलेही स्वारस्य वाटत नाही… तेव्हा व्यक्तीमध्ये मृत्यू ऊर्मीचा संचार असतो….
आपण बरेचदा बातमी वाचताना बघतो… की अचानक एखादी बातमी कानावर पडते अमुक अमुक व्यक्तीने आत्महत्या केली मित्रहो, हे फक्त काही मोठ्या व्यक्तींच्या बाबतीचं घडते असे नाही आजकाल बघायला गेले तर खूप कोवळ्या वयामध्ये असणारे मुले मुली ज्यांनी आपली किशोरावस्था नुकतीच पार केलेली आहे, ज्यांना अजून आपल्या जीवनाविषयी पूर्ण समज आलेली नसते, अशी मुले आत्महत्या करतात ते वाचताना बघताना आपल्यासारख्यांच्या काळजाचा ठोका चुकतो, खरं म्हणजे जगण्याचा ह्या व्यक्तींना होणारा त्रास का सहनशीलतेच्या बाहेर जातो,??
किंवा स्वतःच्या जीवनाविषयी एवढे नकारात्मक विचारापर्यंत या वयातली मुलं मुली का ईतक्या सर्रास पोहचतात हा प्रश्न निर्माण होतो… खरं तर प्रत्येक गोष्टीला कारणे हे असतातच….. कारणाशिवाय जगात काहीचं जन्माला येत नाही असं मला नेहमी वाटतं…. खरं म्हणजे या विषयासाठी मला माझ्या वाचक वर्गाकडून एक गोष्ट नक्की हवी आहे मग वाचक वर्गामध्ये लहान-मोठे ज्ञानाने बुद्धीने वयाने सर्व प्रकारचे लोक आलीत….
तसं पाहिलं तर जगण्याचा होणारा त्रास आपल्याला हे सिद्ध करून दाखवतो, की आपण माणूस आहोत आणि जिवंत आहोत, कारण की मेलेल्या माणसाला कधीच त्रास होत नसतो, त्यामुळे जेव्हा केव्हा त्रास जाणवेल तेव्हा स्वतःला सांगा मी माणूस म्हणून जिवंत आहे म्हणून हा त्रास आहे ,परंतु त्या ठिकाणी ही गोष्ट सुद्धा लक्षात घ्या की होणारा त्रास हा एखाद्या घटना प्रसंगाचा असेल, शरिराचे एखादे दुखणे असेल ,पण त्या ठिकाणी तुम्ही माणूस म्हणून जगता आहात, या जगण्याविषयी मात्र त्रास नका मानून घेवू… त्रास हा आयुष्याचा भाग समजा… परंतु तेच अंतिम समजून घेतले तर जगण्याचा रस राहत नाही….
मला माझ्या मित्र मैत्रिणींना सांगावसं वाटतं जेव्हा कधी तुम्हाला आयुष्य संपवण्याचा विचार येईल ,तेव्हा फक्त इतकाच विचार करा, अशी आपली कुठली मजबुरी आहे की आपल्या जीवनापेक्षा जास्त आहे ,कारणांना थारा नाही ते अगणित असतील परंतु अशी कुठलीचं समस्या नाही ज्यावर तुम्ही उपाय शोधू शकत नाही.. प्रत्येक समस्येला उत्तर असतचं…. फक्त ते शोधावे लागेल आपल्याला…..
प्रेमभंग असेल किंवा आलेलं अपयश असेल किंवा डिप्रेशन सारखा समस्येला बळी पडलेले असाल… मित्रांनो आपल्या जगण्याला आनंदाचे तरंग आपणचं देऊ शकतो ….आपले आयुष्य आनंदाने जगण्यासाठी आपण त्याला नवे रंग नव्या दिशा देवून ऊजळू शकतो ….
जगण्याचा रस संपला की व्यक्ती जगण्यापेक्षा मरणाला मिठी मारणे पसंद करते… जीवन हे अनेक चढ-उतारांनी भरलेले आहे ,जीवन हा प्रवास आहे, माघारी फिरून येण्यासाठी नाही ,तर पुढे जाण्यासाठी प्रवास करावा ….कधी कधी कारण नसतांना मूड खराब असेल, कुठल्याही गोष्टीचा आनंद वाटत नसेल, तेव्हा स्वतःला इतकेच सांगायचे
“”दिन बुरा हैं मेरे यार जिंदगी नही””
चुकून कधीतरी डोळ्यात पाणी आलंचं… तर स्वतःला सांगा…
बिना रोए तो प्याज भी नही कटता,
येतो फिर भी जिंदगी है मेरे दोस्त …..”””
त्रास मग तो कुठलाही असो, प्रत्येक जीवाला त्रास नकोचं असतो …..पण खूप त्रासानंतर मिळणारे सुख हे जास्त आनंद देवून जातं…. जसे खूप कष्टानंतर एखादी गोष्ट मिळाल्याचा आनंद शब्दात व्यक्त होत नाही अगदी तसेचं…. जगण्याबद्दल नेहमी क्युरिअस राहा… ही गोष्ट जगण्यातला रस अबाधित ठेवेलं….
“” चुब रहाँ हैं जो दर्द तुझे ,
वो हिस्सा है जिंदगी का तेरे,
खुशनसीब समझा था लोगों ने तुझें,
फुलों से सजी थी मंजिल तेरी राहो मे काँटे भी थें काटे कभी देखें ही नही थे किसी ने तेरे….””
जगण्यातले स्वारस टिकवून आपल्या आपल्या मार्गाने जगण्याचा आनंद ऊधळूया….एकही क्षण जगण्याचा सोडूचं नये…. सुंदर अशा आयुष्यात फक्त आठवणीचं राहणार आहे…. जर आपल्या आजूबाजूला कोणी असेल की ज्यांना आपल्या जगण्यात कुठलाच आनंद वाटत नसेल, तर कृपया करून त्यांना आपल्या जगण्याचे ,आनंदाचे दोन क्षण द्या… ठरवले तरचं जगण्याचा आनंद घेता येतो, नाही तर आपले नकारात्मक सूर आपल्याला आपल्या जवळ असलेल्या गोष्टींचे सुद्धा सुख अनुभव देतं नाही… जर जगण्यासाठी आपण कुणाच्या चेहर्यावर एक स्माईल आणू शकलो तरी सुद्धा खूप आहे,संकटात असणार्याला धीर देता आला ते सुद्धा खूप मोठी गोष्ट असते ….
काळजी घ्या आपली आपल्या माणसांची आणि ” जगण्यातल्या आनंदाला येऊ द्या प्रेमाचे उधाण सारे, मिळुनी करुया संकल्प नवे जगण्याचे क्षण सोहळे म्हणूनही साजरे करूया सारे……!!””
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


