Skip to content

काहींना गरजेपेक्षा अधिक महत्व देणं म्हणजे स्व महत्व कमी करणं.

काहींना गरजेपेक्षा अधिक महत्व देणं म्हणजे स्व महत्व कमी करणं.


सोनाली जे


स्वत्व म्हणजे मी . माझा इगो नाही म्हणता येणार , पण स्वाभिमान. स्व’त्व म्हणजे परिस्थिती, जडणघडण, अनुभव यातून घडलेले, वेगळेपण असणारे आपले व्यक्तित्व, आपल्या अस्तित्वाची जाणीव. स्वत:ला ओळखता आले तर ‘स्व’त्व जपता येते.

बरेचदा लोक गैरसमज करून घेतात स्वाभिमान आणि इगो यात. काही लोकांना सवय असते अंथरूण बघून पाय पसरण्याची. नाही तर आपले अंथरूण मोठे करण्याची क्षमता वाढविण्याची. कोणाकडे कधी हात पसरणे माहिती नसते. पण समजून कोणी मदत केली तर ती ही स्वीकारण्याची तयारी असते. पण असे फार कमी लोक असतात जे अशा स्वत्व जपणाऱ्या लोकांना समजून घेतात. इतर लोकांच्या दृष्टीने या लोकांवर शिक्का बसतो तो म्हणजे egoistic किंवा तिरकस , आखडू .कसे असते या स्वत्व जपणाऱ्या लोकांना आपल्या मधल्या क्षमता माहिती असतात. मर्यादाही माहिती असतात. त्यानुसार ते वागत असतात.

भारतीय बनावटीची कार निर्माण करण्याचे रतन टाटा यांनी ठरविले आणि पहिली संपूर्ण भारतीय बनावटीची कार टाटा इंडिका त्यांनी तयार करून बाजारात आणली . ती लोकांनी घेतली ही . त्यानंतर एकदा रतन टाटा गाडीतून जात होते. अचानक पावूस सुरू झाला आणि पावसाच्या पासून बचाव करण्याकरिता एका स्कूटर वरील नवरा बायको आणि त्यांची दोन लहान मुले पटकन पुलाच्या खाली आडोशाला थांबले तेव्हा छोट्या कुटुंबाकरिता आणि सामान्य लोकांना परवडेल अशी स्वस्तात गाडी काढायची ठरविली आणि त्यांनी टाटा नॅनो कार बाजारात आणली.

काही वर्षांनी रतन टाटा यांची कार कंपनी करिता बाजारपेठेत पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही . म्हणून मग त्यांनी ती विकायचे ठरविले त्यावेळी फोर्ड कंपनीच्या बिल फोर्ड यांच्या सोबत एक meeting fix झाली. रतन टाटा त्यांना भेटायला गेले . तेव्हा बिल फोर्ड रतन टाटाना म्हणाले की तुम्हाला कार मधले काही माहिती नाही. तुम्हाला कार चा बिझनेस कसा करायचा याची काही माहिती नाही. तुम्ही या बिझनेस ची सुरुवातच का केली ?

आज तुमची कंपनी विकत घेवून आम्ही तुमच्यावर खूप उपकार करत आहोत. तेव्हा बिल फोर्ड यांचे हे बोलणे ऐकून रतन टाटा यांना खूप वाईट वाटले . ही गोष्ट त्यांच्या मनाला म्हणजेच स्व ला खूप लागली, त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला. त्यांनी ते deal cancel केले . काहीच बोलले नाहीत आणि तिथून निघून गेले.
ते इंडिया मध्ये परत आले त्यांनी आपल्या staff ला , employees ना सांगितले की आता खूप मेहनत करावी लागेल , आणि त्यानंतर सगळ्यांच्या प्रयत्नांनी टाटा इंडिका ची विक्री ही वाढली. कंपनी ही फायद्या मध्ये येवू लागली.

आणि इकडे मात्र फोर्ड कंपनी दिवसेंदिवस घाट्यात जावू लागली. तेव्हा रतन टाटांनी विचार केला की यांची मदत करू . आणि अजून एक meeting बॉम्बे house मध्ये फिक्स झाली. त्यात डिस्कशन मध्ये रतन टाटा बिल फोर्ड यांना म्हणले की मी तुमची ही कंपनी जी Land Rover आणि जग्वार कंपनीची मॉडेल बनवत ती कंपनी , या meeting मध्ये ही फोर्ड कंपनी घेण्याचे deal final करण्यात आले. आणि तेव्हा बिल फोर्ड रतन टाटांना म्हणाले की , आज आमची कंपनी खरेदी करून तुम्ही आमच्यावर खूप उपकार करत आहात.
आधी जेव्हा रतन टाटा यांना गरज होती तेव्हा त्यांचा स्वाभिमान , मन दुखावले गेले. रतन टाटा यांचे स्व , दुखावले होते तरी ही ते शांत राहिले. आणि दहा वर्षात बिल फोर्ड यांना त्यांच्या बोलण्याचे उत्तर आता मिळाले होते. जे रतन टाटा यांनी कार उद्योगात केलेली प्रगती.

म्हणून कधी कोणी स्व , स्वाभिमान , मन दुखावले तर शांत रहा , successful बना. ही यशस्वीता खूप जास्त ताकदवान असते. ” ज्यादा शोर मचाती है !! रतन टाटा यांच्या उदाहरणातून त्यांचा स्व , स्वाभिमान दुखावला गेला तर शांत राहून आपल्याला मिळालेले एक नवीन आव्हान आहे असे समजते. जिद्द निर्माण होते.

रोजच्या व्यवहारात स्त्रियांना हे येत नाही ते येत नाही , जमत नाही , ताकदीने कमी असतात मुली हे सतत ऐकून घेतल्यावर मुलींचा ही स्वाभिमान दुखावतो आणि त्या मेहनत , शिकण्याची प्रचंड जिद्द , कष्ट करण्याची तयारी , सातत्य या अनेक प्रयत्नाने प्रत्येक क्षेत्रात आघाडी मिळवितात. लहान मुलांना सुधा पालक सतत अभ्यास करा असे मागे लागतात तेव्हा त्यांचा स्व , दुखावला जातो पण मग ही मुले ध्येयाने पेटून उठतात. जिद्द , सातत्य , परिश्रम करून यश संपादन करतात.

चेंडू जेवढ्या जास्त जोरात खाली आपटला जातो तेवढ्याच जास्त ताकदीने तो उफाळून वर येतो , त्याचप्रमाणे स्वत्व जपणारी माणसे कठीण प्रसंग असो अथवा रोजच्या व्यवहारात ही अतिशय चिकाटी , जिद्द , आत्मसन्मान , स्वाभिमानाने पेटून उठतात आणि योग्य दिशेने मार्गक्रमण करत असतात.

काही नात्यांमध्ये ही सतत एक जण ते टीकविण्याकरिता प्रयत्न करत असेल , समोरच्याला काही गरज नाही असे वागत असेल तरी मग कधी तरी नाती टीकविनारा ही आपल्या स्व चे रक्षण करण्याकरिता दुसऱ्याला त्याची स्पेस देवून अलिप्त होतो/ होते.

नवरा बायको यात कधी भांडणे झाली आणि नवरा कधीच चूक नाही असाच वागत असेल . बायको मात्र नाती जपण्यासाठी सतत समजून घेवून जावू दे असे म्हणून विषय सोडून देत असेल पण तरी ही त्याच्या वागणुकीत फरक पडत नसेल , छोट्या गोष्टी पासून मोठ्या गोष्टी मध्ये बायको वर चिडचिड , राग करत असेल , भांडत असेल, आर्थिक support करत नसेल. अनेक वेळा मागून ही पैसे , रोजच्या खर्चाला ही पैसे देत नसेल, मुलांच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर बायकोचा स्वाभिमान , स्व कायम दुखावला जातो आणि त्याच्याकडून ती अपेक्षा ठेवणे सोडून देते. सतत हात पसरून मागणे तिचा स्वाभिमान दुखावतो . ती मग नवऱ्याकडून अपेक्षा सोडून देते जे असेल ते स्वीकारते , स्वतः कष्ट करते , घरासाठी असेल , मुलांच्या प्रगती करिता असेल ती सतत धडपड करत राहते, आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्याकरिता नोकरी , व्यवसाय करू लागते. तिच्या स्व ला दुखावले तर प्रसंगी ती नवचंडी सारखी रौद्र रूपही धारण करते.

कोणाचा ही स्व दुखावला तर एक तर नकारात्मक किंवा दुसरी सकारात्मक भूमिका घेतली जाते . नकारात्मक भूमिका चिडचिड , राग , भांडण असेल , नोकरी सोडणे असेल , अभ्यास सतत च बोलणी खावी लागतात . स्व एव्हढा दुखावला जाईल की नकारात्मक विचार वाढीस लागतील आणि अभ्यासातला इंटरेस्ट ही जाईल . किंवा अजून कमी होईल.

प्रत्येकजण काही ना काही प्रमाणात आपला स्व , स्वाभिमान जपत असतो / असते. वेळ प्रसंगी स्व जागृत ही ठेवावा. नाही तर लोक तुम्हाला गृहीत धरतात. तुम्ही त्यांच्या चेष्टेचा विषय ही होता. ते जसे वागवतील तसेच वागावे लागते आणि आयुष्यभर मग पडतीं बाजूच स्वीकारावी लागते. त्यामुळे आपल्याला इतरांच्या हातची कठपुतली , कळसूत्री बाहुली होवू देवू नका .त्याची मुख्य कळ तुमच्या स्वतः कडे ठेवा. वेळ प्रसंगी ती दाबून तुमचा स्व जागृत करून सडेतोड उत्तर द्या ..सडेतोड वागा. फक्त त्याचा अतिरेक होवू देवू नका.

पितळ आणि सोने वरून सारखेच दिसते. पण पारख केली, त्याचे स्वत्व पारखले की सोने चमकून तेजाळते आणि पितळ काळे पडते .सोन्यासारखी हीच परीक्षा असते जे आपले स्वत्व जपत असते.

आयुष्य सुंदर आहे.” स्वत्व “ओळखून उसळणाऱ्या चेंडू प्रमाणे सातत्य राखून स्वतः ला सोन्यासारखे सिध्द करा.

 


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!