एखादी व्यक्ती जेव्हा दुःख देते, तेव्हा त्यात ५०% सहभाग आपलाच असतो.
सौ.मयुरी महेंद्र महाजन
पुणे (चिंतामणी चौक)
तुम्ही सगळ्यांनी कदाचित ती गोष्ट ऐकली असेल की एक व्यक्ती भिंतीवर चेंडू आधळून स्वतःचा राग त्या चेंडूच्या माध्यमातून बाहेर काढत असतो, परंतु त्याला ज्या काही गोष्टींचा त्रास होत होता व त्याच्या ज्या काही समस्या होत्या त्याचे उत्तर मात्र त्यांना तेथेच भेटले की मी या चेंडूला जितक्या ताकदीने फेकत आहे ,तो तितक्याच वेगाने माझ्याकडे येत आहे त्यामुळे माझ्या समस्यांना मी स्वतः सुद्धा तितकाच जबाबदार आहे जितके मी फक्त दुसऱ्यांना त्याचा दोष देत होतो….
मी तुम्हाला ही गोष्ट सांगण्यामागे एकचं तात्पर्य की आपल्या सुखदुःखाच्या व्याख्या आपण ठरवलेल्या असतात…., नाहीतर कधीतरी स्वतः ला निक्षून पाहावं… स्वतःच्या बाबतीत घडणार्या गोष्टी आपण स्वीकारत नाही ईतकेचं जोपर्यंत कुठल्याही गोष्टीत आपला सहभाग नसेल, तोपर्यंत नाही आपल्याला त्याचे दुःख होणार आहे ,नाही त्यात असणारे सुख अनुभवता येणार आहे… मानलं तर जगात सुख आहे नाही तर सर्व काही असून सुद्धा प्रत्येकाला कसली न कसली कमी आहेचं…. रामदास स्वामी म्हणतात…”
” जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुच शोधूनी पाहे””
जरी तुम्हाला हा विषय वाचत असताना जाणवले की असं नाही होऊ शकतं….तर मला तुम्हाला सांगायला खूप आवडेल की प्रत्येक्षरित्या जरी तुम्हाला तुमचा सहभाग नाही जाणवला, तरी अप्रत्यक्ष रीत्या मात्र आपल्या सर्वांचा त्यामध्ये 50 टक्के सहभाग असतोच पण ते आपण स्वीकारत नाही इतकेच…,
आणि दुसरी गोष्ट आपल्याला सर्वांना कुठल्याही व्यक्तीचे दुःख होत नसते, दुःख या गोष्टीचे वाटते की आपण त्या व्यक्तीकडून केलेल्या अपेक्षा आपल्याला दुखावतात, मुळात मानवाची रचना झाल्याबरोबर अपेक्षांचे समीकरण त्या सोबत जोडलेले आहे, फरक फक्त इतकाच आहे की काळानुरूप बदलत जाणारी जीवनशैली त्याबरोबर घडत जाणारे घटना प्रसंग त्यामध्ये होत जाणारी वाढ मुख्यत्वेकरून मानवाच्या दुःखाचे कारण बनते आणि त्याचे परिणाम मात्र व्यक्ती दुसऱ्याला दोषी समजवण्यात घालवते….
तसं पाहिलं तर व्यक्तीने नको त्या अपेक्षा करूच नये कारण अपेक्षा भंग झाल्याचे दुःख पचवणे अवघड जाते तेव्हा एखाद्या व्यक्तीने मला खूप दुःख दिलेलं आहे, त्या व्यक्तीमुळेचं मला दुःख झाले, असे काहीसे घडते…. परंतु मित्रांनो जेव्हा आपण कोणाकडे बोट दाखवणार त्याच वेळेस बाकीची असलेली बोटे आपल्याकडेच असतात… तो एक प्रकारचा संदेश आहे आपल्या स्वतःसाठी आपण नेहमी कुठल्याही बाबतीत समोरच्याला दोषी धरुचं नये…
जसे की तुम्ही ऐकले असेलं एका हाताने टाळी वाजत नाही.. म्हणजे जितका समोरच्या व्यक्तीचा रोल त्यामध्ये महत्त्वाचा आहे तितकेच महत्त्व आपल्या रोल ला सुद्धा आहेचं दुसर्यांच्या चुका आपल्याला खूप लवकर लक्षात येतात ..परंतु आपल्यात आपल्या चुका शोधण्यासाठी धाडस लागते….
प्रत्येक आईला आपले मुलं प्रिय असते ,आपल्या मुलाने जरी काही खोडी केली असेल ,तरी आई लेकराला पोटाशीचं धरते ना… तसेच आपण आपल्याला नेहमीच योग्य समजतो ….एखादी व्यक्ती जेव्हा दुःख देते त्यात 50 टक्के सहभाग आपलाच असतो जरं आपण हे मान्य केले तर त्यामुळे दोन गोष्टी खूप चांगल्या घडतील एक म्हणजे जशी आपल्या सुखाची जबाबदारी आपली आहे… त्याचप्रमाणे आपल्या दुःखाची जबाबदारी सुद्धा आपलीच असणार आहे….
आणि दोन आपण आपल्या स्वतःचे आत्मपरीक्षण करून स्वतःला तपासू शकतो की आपल्या दुःखाचे मूळ नेमके आपल्या कोणत्या गोष्टीत लापलेले आहे… जेणेकरून आपण आपल्या मुळा पर्यंत पोहोचलो तर दुःख आणि समस्या फक्त आयुष्यातला शिल्लक तक्रारी असतील यात शंका नाही…. हे तेव्हाच होऊ शकते हे आपण स्वतःच स्वतःच्या मनाने ती स्वीकारणार ….
कारण काही गोष्टी कितीही चांगल्या वाचल्या तरी त्या आपल्याला कोणावर लादता येत नाही …लादलेल्या गोष्टीमुळे माणूस दुबळा बनत जातो आणि तीच गोष्ट जरं त्या व्यक्तीला कळाली ल तर मात्र त्याची ती ताकद बनत जाते… आणि ह्या गोष्टी आपल्यात लोणच्या प्रमाणे मुरणार्या आहेत…ज्या आधी खूप कडवट वाटतील… परंतु नंतर मात्र खूप आनंद देणार्या असतील…
एखाद्या व्यक्तीविषयी मनात दुःख वाटून घेण्यापेक्षा त्यातून आपला सहभाग काढून टाकला तर दुःखाची तीव्रता कमी होईल अपेक्षांच्या ओझ्याखाली दुःखाचे दमन करण्यापेक्षा थोड्या अपेक्षा बाजूला सारून त्याचा निचरा होऊ द्या…. जर खरच आयुष्य भरभरून जगायचं असेल तर आपणच आपल्याला ओळखूया… आणि आनंदात न्हाऊ या….
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


