एक समजून सांगू शकत नाही आणि दुसरा समजून घेऊ शकत नाही.
सोनाली जे
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला.मधुसूदन कालेलकर यांचे गीत, किती समर्पक आहे ना !!! आपल्या सगळ्यांना हा कुठे ना कुठे अनुभव असतोच की वेळेला एक समजून सांगू शकत नाही आणि दुसरा समजून घेवू शकत नाही. आणि मग वेळ निघून जाते.
आपले आई वडील मुलांना त्यांच्या चांगल्या करिता एखादी गोष्ट सांगत असतात हे करू नको , हे कर , पण मुलांना नेहमी ते चुकीचे वाटत असते. जसे आठवी , नववी , दहावी हा आयुष्याचा पाया आहे, वेळ ठरवून अभ्यासाला बसा. खूप sincerely अभ्यास करा. प्रत्येक क्षण महत्वाचा. पण आजकाल मुले हे समजूनच घेत नाहीत. त्यांना मित्र मैत्रिणी , सोशल मीडिया , पार्टीज , हॉटेलिंग यात च जास्त इंटरेस्ट असतो. हेच विश्व असे वाटत असते. झगमगाट , दिखावा , याने भारावून जातात. अभ्यास सोडून इतर गोष्टीत वेळ घालवत असतात अशावेळी पालकांनी किती ही समजून सांगितले तरी मुले ऐकत नाहीत.
कधी पालक गोड बोलून , समजावून सांगून , बक्षीस देवून तर कधी चिडून , रागावून , शिक्षा देवून समजवतात. शेवटी पालकांची ही मर्यादा संपते. त्यांचे पेशन्स ही संपतात , मुलांना त्यांचे भवितव्य पुढचे शिक्षण यावर समजावले तरी समजू शकत नाहीत आणि एक मर्यादा , कदाचित विचार , पिढी यातले अंतर असेल त्यांच्या पद्धतीने त्या पुढे पालक समजून सांगू ही शकत नाहीत .आणि मुले पालकांची ही अंतकरण पूर्वक धडपड , प्रयत्न समजूनही घेत नाहीत कारण तेव्हा त्यांच्या डोळ्यावर झापड असते.
असेच आहे मैत्री , प्रेमभंग , लग्न याचे ही काही वेळेस किरकोळ कारणे असतात त्यावरून नवरा बायको , प्रियकर प्रेयसी , मित्र मैत्रिणी यांनी एकमेकांना कितीही समजून सांगितले तरी दुसरा / री समजून घेत नाही. सध्याच्या covid काळात या दोन वर्षात हे बऱ्याच जणांसोबत घडलेले आहे. Lockdown मध्ये रोज भेटणारे प्रियकर प्रेयसी भेटू शकत नाहीत. संवाद ही साधू शकत नाहीत कारण सगळेच घरी असतात. आणि परत तेवढा मोकळेपणा नसतो. काही वेळेस माहिती नसते घरी तर काही वेळेस लपून छपून सुरू असते सगळे.
प्रेयसी वेळ देवू शकली नाही, ती तिच्या घरच्यांचसोबत होती , फोन करू शकली नाही , मेसेज करू शकली नाही म्हणून रोजचे सवयीचे झालेल्या प्रियकराला राग आला, चिडचिड झाली. मी महत्वाचा नाही बाकी सगळे महत्वाचे. मग कोणासोबत , तेव्हाच का असे अनेक प्रश्न आणि गैरसमज यातून प्रेयसी ने खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला .. प्रत्येक वेळेचे पुरावे दिले तरी ही प्रियकराला ते न पटनारे. तो एवढेच घेवून बसतो मी महत्वाचा नाही बाकी सगळे महत्वाचे.
आणि यात प्रेयसी चे त्याच्यावर जीवापाड प्रेम आसले , तिच्या आयुष्यात त्याचे स्थान जरी उच्च स्थानी आहे हे पटविण्याचा , सांगण्याचा , आपल्या प्रेमातल्या आनंदी , चांगल्या गोष्टींची आठवण करून देवून परत प्रेमात तोच आनंद , उत्साह आणण्याचा प्रयत्न केला , सगळे विसरून जावून परत भेटू म्हणले तरी त्या गोष्टी विसरून नवीन सुरुवात करताना ही परत कधी जर भेट होवू शकली नाही तर तेच तेच विचार डोक्यात येत राहतात. परत त्याच विचारात अडकून पडल्यावर , परत गैरसमज , अविश्वास दाखविला जातो. त्यातून किती ही झाले तरी
एक समजून सांगू शकत नाही आणि दुसरा समजून घेऊ शकत नाही.
काचेचा ग्लास हातातून खाली पडला तर काचेला तडा गेला की तो glass परत वापरू शकत नाही. त्याची डागडुजी होवू शकत नाही तसेच काहीसे इथेही होते. सोना ला एखादी गोष्ट बरोबर वाटते पण तीच मोनाला चुकीची .तसेच कदाचित मोना ची सोना ला चुकीची वाटू शकते.
जसे 6 आकडा जसा मला सहा सोनाला सहा दिसतो परंतु तोच विरुद्ध बाजूला उभ्या असलेल्या मोना ला नऊ दिसतो दोघींच्या दृष्टीने ते बरोबरच असते.
बरेचवेळा. परिस्थिती ही अशीच असते. आपले बरोबर आहे म्हणजे समोरच्याचे चूक असे आपण समजत असतो. पण प्रत्येक्षात तसे नसते ना.. आपले बरोबर आहे तसे त्याचे ही बरोबर असते. पण आपल्याला आपले बरोबर याची पूर्ण खात्री असते त्यामुळे त्यापलीकडे काही वेगळे असू शकते हे माहिती नसते म्हणजे अज्ञान ही असू शकते.
तर काही वेळेस माझे बरोबर म्हणजे त्या पलीकडे काहीच बरोबर नाही बाकी चूक हा मोठा गैरसमज असतो. तर कधी कधी बाकी समजून घेण्याची वृत्ती , मानसिकता नसते. किंवा आपल्याला update करण्याची तयारी नसते.
किंवा काहीच नाही पण परिस्थिती , दृष्टिकोन , काळ , वेळ मानसिकता , यावर ही आपले निर्णय ठाम असतात. आपले बरोबर दुसऱ्याचे चूक यावर ठाम असतात. यातून एक समजून सांगू शकत नाही आणि दुसरा समजून घेऊ शकत नाही.
प्रत्येकाचे Values…Ethics…Culture….Social challenges…Mob Psychology…. ही वेगळी असते. प्रत्येकाचे experience , अनुभव , perspective ..दृष्टिकोन वेगवेगळा असतो. आजूबाजूचे वातावरण वेगळे असते. या सगळ्यातून काही मते निश्चित होत असतात. विचार पक्के होत असतात
आणि आपण त्यावर blindly विश्वास ठेवतात त्यानुसार वागतात . तेच खरे असे गृहीत धरतो आणि काही गोष्टी वर ठाम राहत असतात . पण दुसऱ्या व्यक्ती बाबत ही भिन्नता असते. त्यामुळे ही समोरचा जे सांगत आहे ते समजून घेण्याची मानसिकता नसते.
एका ऑफिस मध्ये अनुभवी असलेला अधिकारी काम करत असतो . अचानक एके दिवशी तो राजीनामा लिहून साहेबांच्या टेबलवर ठेवतो . साहेब म्हणतात तू का राजीनामा देतोस , तुझे काम चांगले आहे, sincere आहेस, अनुभव आहे. तर तो साहेबाना सांगतो ऑफिस मधले बाकीचे लोक माझ्या विषयी कुजबुज करत असतात. ती तरुण पिढी आहे आणि त्यांच्यात मला घेत ही नाहीत . मी जरी माझे काम करीत असले तरी ते माझ्याविषयी बोलत असतात.
साहेब त्याला समजून सांगतात अरे असे तुझ्या मनाला वाटते ते त्यांचे ते काम करत असतात. तुझ्या विषयी नाही बोलत . पण तो म्हणतो नाही ते माझ्याविषयी च बोलतात. साहेब एव्हढे ही सांगतात की अरे तू इथे तुझे काम करायला येतोस , तू त्यावर focus कर, इतर काय म्हणले याच्याकडे दुर्लक्ष कर , यात बाकी कोणाचा लॉस नाही तुझा अनुभव आहे आणि तुझे promotion due आहे या सगळ्यापासून मग आर्थिक प्रगती , ऑफिस मधील पदाची उन्नती , त्यातून तुझे समाज , कुटुंब यात ही वाढणारा दर्जा यावर पाणी सोडावे लागेल. तू अविचार करतो आहेस तरी हे त्याला तेही पटत नाही.
साहेब अनेक प्रकारे समजून ही तो समजून घेवू शकत नाही.आणि शेवटी आपला राजीनामा देवून जातो. साहेबाना वाईट वाटते कारण आपला एक चांगला हुशार माणूस , एक्स्पर्ट , जो त्याच्या कामात तरबेज आहे आणि जो कंपनी करिता कायम फायदा करून देणारा आहे तो आपल्याला सोडून जात आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी तो काम ही करणार नाही कारण त्याला ऑफिस staff ने दिलेला वाईट अनुभव , त्यामुळे तो निराश झाला आहे. उलट तो आवडती काम करत रहीला तर उत्साही राहील आणि स्वतः ची company ची ही प्रगती करेल ,
पण केवळ एक समजून सांगू शकत नाही आणि दुसरा समजून घेऊ शकत नाही.
काही वेळेस मात्र वारंवार तेच तेच अनुभव येत गेले , अनेक वेळा समोरच्याला समजून घेत आलो आणि तरी ही प्रत्येक वेळी तसेच वागणे असते. त्यात समजून घेतो म्हणजे त्याला / तिला गरज आहे अशीच भावना , attitude निर्माण होतो. जरी एखाद्याने समजून सांगून परत पुढे जायचे ठरविले तरी प्रत्येक वेळी त्याची आवड , निवड , सवड यातून भेट असेल किंवा आपल्याला भेटण्यासाठी , बोलण्यासाठी वेळ नाही पण तो च वेळ इतरांना मात्र सहज आणि आनंदाने देत असेल आणि प्रत्येक वेळी सांगून, बोलून , भांडून ही तो समजून घेत नसेल उलट तेच वागणे असेल तर मात्र आपण त्याला समजून सांगणे आणि समजून घेणे दोन्ही ही सोडून देतो. आणि त्याची स्पेस त्याला देतो. कायमचे दुरावतो.
” वोह इंसान कभी भी आपकी value नहीं समझ सकता जीस के लिये आप हमेशा available है !
जब सोच मैं मोच आती है रिष्तो मैं खरोच आती है !!
आपल्या आयुष्यात समजून घेणारे आणि समजून सांगणारे आपलेच असतात आणि ते फार थोडे म्हणजे बोटांवर मोजण्याइतके असतात.. जिथे समजून सांगणारा आहे तिथे कधी तरी समजून घ्यावे. निदान काही तरी आपलेपणाने सांगतो आहे याचा विचार करावा. कधी आपल्याला , मनाला , विचार यांना मेंटल ब्लॉक येत असतो. आणि अशा वेळी इतर कोणी सांगते ते निदान ऐकावे.
कधी समोरच्याला आपल्या असण्याने किंवा नसण्याने ही फरक पडत नाही. तेव्हा मात्र त्यांना काही सांगून ही समजत नाही अशावेळी शांत राहावे. अनेकदा असे होते की काही बोलायचे आहे पण बोलणार नाही.
आयुष्य सुंदर आहे. एकमेकांना समजून घेण्यात आणि समजून वागण्यात आपलेपणा आहे. एकमेकांची काळजी आहे. ओढ आहे. आपल्यातला ओलेपणा टिकवा.
फक्त प्रेम करून चालत नाही तर ते टिकविणे महत्वाचे असते. त्यात प्रेम , काळजी , विश्वास , आपलेपणा , सुख , दुःख , राग , खुशी तर कधी jealousy ही गरजेची असते जी relationship टिकवून ठेवत असते.
एक समजून सांगू शकत नाही helpless असतो , आणि दुसरा समजून घेऊ शकत नसेल, त्याला पाहिजे तसेच समजून घेत असेल , प्रत्येकवेळी तसेच असेल तर थोडा ब्रेक घ्या. दोघंही विचार करा.वेळ द्या. संधी द्या.शांत रहा. सारासार विचार करा.
भावना ओसरल्या की सगळे शांत होते.
सोनाली जेएक समजून सांगू शकत नाही आणि दुसरा समजून घेऊ शकत नाही.
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला
मधुसूदन कालेलकर यांचे गीत, किती समर्पक आहे ना !!!
आपल्या सगळ्यांना हा कुठे ना कुठे अनुभव असतोच की वेळेला एक समजून सांगू शकत नाही आणि दुसरा समजून घेवू शकत नाही. आणि मग वेळ निघून जाते. आपले आई वडील मुलांना त्यांच्या चांगल्या करिता एखादी गोष्ट सांगत असतात हे करू नको , हे कर , पण मुलांना नेहमी ते चुकीचे वाटत असते.
जसे आठवी , नववी , दहावी हा आयुष्याचा पाया आहे, वेळ ठरवून अभ्यासाला बसा. खूप sincerely अभ्यास करा. प्रत्येक क्षण महत्वाचा.
पण आजकाल मुले हे समजूनच घेत नाहीत. त्यांना मित्र मैत्रिणी , सोशल मीडिया , पार्टीज , हॉटेलिंग यात च जास्त इंटरेस्ट असतो. हेच विश्व असे वाटत असते. झगमगाट , दिखावा , याने भारावून जातात. अभ्यास सोडून इतर गोष्टीत वेळ घालवत असतात अशावेळी पालकांनी किती ही समजून सांगितले तरी मुले ऐकत नाहीत.
कधी पालक गोड बोलून , समजावून सांगून , बक्षीस देवून तर कधी चिडून , रागावून , शिक्षा देवून समजवतात. शेवटी पालकांची ही मर्यादा संपते. त्यांचे पेशन्स ही संपतात , मुलांना त्यांचे भवितव्य पुढचे शिक्षण यावर समजावले तरी समजू शकत नाहीत आणि एक मर्यादा , कदाचित विचार , पिढी यातले अंतर असेल त्यांच्या पद्धतीने त्या पुढे पालक समजून सांगू ही शकत नाहीत .आणि मुले पालकांची ही अंतकरण पूर्वक धडपड , प्रयत्न समजूनही घेत नाहीत कारण तेव्हा त्यांच्या डोळ्यावर झापड असते.
असेच आहे मैत्री , प्रेमभंग , लग्न याचे ही काही वेळेस किरकोळ कारणे असतात त्यावरून नवरा बायको , प्रियकर प्रेयसी , मित्र मैत्रिणी यांनी एकमेकांना कितीही समजून सांगितले तरी दुसरा / री समजून घेत नाही. सध्याच्या covid काळात या दोन वर्षात हे बऱ्याच जणांसोबत घडलेले आहे. Lockdown मध्ये रोज भेटणारे प्रियकर प्रेयसी भेटू शकत नाहीत. संवाद ही साधू शकत नाहीत कारण सगळेच घरी असतात. आणि परत तेवढा मोकळेपणा नसतो. काही वेळेस माहिती नसते घरी तर काही वेळेस लपून छपून सुरू असते सगळे.
प्रेयसी वेळ देवू शकली नाही, ती तिच्या घरच्यांचसोबत होती , फोन करू शकली नाही , मेसेज करू शकली नाही म्हणून रोजचे सवयीचे झालेल्या प्रियकराला राग आला, चिडचिड झाली. मी महत्वाचा नाही बाकी सगळे महत्वाचे. मग कोणासोबत , तेव्हाच का असे अनेक प्रश्न आणि गैरसमज यातून प्रेयसी ने खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला .. प्रत्येक वेळेचे पुरावे दिले तरी ही प्रियकराला ते न पटनारे. तो एवढेच घेवून बसतो मी महत्वाचा नाही बाकी सगळे महत्वाचे.
आणि यात प्रेयसी चे त्याच्यावर जीवापाड प्रेम आसले , तिच्या आयुष्यात त्याचे स्थान जरी उच्च स्थानी आहे हे पटविण्याचा , सांगण्याचा , आपल्या प्रेमातल्या आनंदी , चांगल्या गोष्टींची आठवण करून देवून परत प्रेमात तोच आनंद , उत्साह आणण्याचा प्रयत्न केला , सगळे विसरून जावून परत भेटू म्हणले तरी त्या गोष्टी विसरून नवीन सुरुवात करताना ही परत कधी जर भेट होवू शकली नाही तर तेच तेच विचार डोक्यात येत राहतात. परत त्याच विचारात अडकून पडल्यावर , परत गैरसमज , अविश्वास दाखविला जातो. त्यातून किती ही झाले तरी
एक समजून सांगू शकत नाही आणि दुसरा समजून घेऊ शकत नाही.
काचेचा ग्लास हातातून खाली पडला तर काचेला तडा गेला की तो glass परत वापरू शकत नाही. त्याची डागडुजी होवू शकत नाही तसेच काहीसे इथेही होते.
सोना ला एखादी गोष्ट बरोबर वाटते पण तीच मोनाला चुकीची .तसेच कदाचित मोना ची सोना ला चुकीची वाटू शकते. जसे 6 आकडा जसा मला सहा सोनाला सहा दिसतो परंतु तोच विरुद्ध बाजूला उभ्या असलेल्या मोना ला नऊ दिसतो दोघींच्या दृष्टीने ते बरोबरच असते.
बरेचवेळा परिस्थिती ही अशीच असते. आपले बरोबर आहे म्हणजे समोरच्याचे चूक असे आपण समजत असतो. पण प्रत्येक्षात तसे नसते ना.. आपले बरोबर आहे तसे त्याचे ही बरोबर असते.
पण आपल्याला आपले बरोबर याची पूर्ण खात्री असते त्यामुळे त्यापलीकडे काही वेगळे असू शकते हे माहिती नसते म्हणजे अज्ञान ही असू शकते. तर काही वेळेस माझे बरोबर म्हणजे त्या पलीकडे काहीच बरोबर नाही बाकी चूक हा मोठा गैरसमज असतो. तर कधी कधी बाकी समजून घेण्याची वृत्ती , मानसिकता नसते. किंवा आपल्याला update करण्याची तयारी नसते.
किंवा काहीच नाही पण परिस्थिती , दृष्टिकोन , काळ , वेळ मानसिकता , यावर ही आपले निर्णय ठाम असतात. आपले बरोबर दुसऱ्याचे चूक यावर ठाम असतात. यातून एक समजून सांगू शकत नाही आणि दुसरा समजून घेऊ शकत नाही.
प्रत्येकाचे Values…Ethics…Culture….Social challenges…Mob Psychology…. ही वेगळी असते. प्रत्येकाचे experience , अनुभव , perspective ..दृष्टिकोन वेगवेगळा असतो. आजूबाजूचे वातावरण वेगळे असते. या सगळ्यातून काही मते निश्चित होत असतात. विचार पक्के होत असतात आणि आपण त्यावर blindly विश्वास ठेवतात त्यानुसार वागतात . तेच खरे असे गृहीत धरतो आणि काही गोष्टी वर ठाम राहत असतात . पण दुसऱ्या व्यक्ती बाबत ही भिन्नता असते. त्यामुळे ही समोरचा जे सांगत आहे ते समजून घेण्याची मानसिकता नसते.
एका ऑफिस मध्ये अनुभवी असलेला अधिकारी काम करत असतो . अचानक एके दिवशी तो राजीनामा लिहून साहेबांच्या टेबलवर ठेवतो . साहेब म्हणतात तू का राजीनामा देतोस , तुझे काम चांगले आहे, sincere आहेस, अनुभव आहे. तर तो साहेबाना सांगतो ऑफिस मधले बाकीचे लोक माझ्या विषयी कुजबुज करत असतात. ती तरुण पिढी आहे आणि त्यांच्यात मला घेत ही नाहीत . मी जरी माझे काम करीत असले तरी ते माझ्याविषयी बोलत असतात.
साहेब त्याला समजून सांगतात अरे असे तुझ्या मनाला वाटते ते त्यांचे ते काम करत असतात. तुझ्या विषयी नाही बोलत . पण तो म्हणतो नाही ते माझ्याविषयी च बोलतात. साहेब एव्हढे ही सांगतात की अरे तू इथे तुझे काम करायला येतोस , तू त्यावर focus कर, इतर काय म्हणले याच्याकडे दुर्लक्ष कर , यात बाकी कोणाचा लॉस नाही तुझा अनुभव आहे आणि तुझे promotion due आहे या सगळ्यापासून मग आर्थिक प्रगती , ऑफिस मधील पदाची उन्नती , त्यातून तुझे समाज , कुटुंब यात ही वाढणारा दर्जा यावर पाणी सोडावे लागेल. तू अविचार करतो आहेस तरी हे त्याला तेही पटत नाही.
साहेब अनेक प्रकारे समजून ही तो समजून घेवू शकत नाही.आणि शेवटी आपला राजीनामा देवून जातो. साहेबाना वाईट वाटते कारण आपला एक चांगला हुशार माणूस , एक्स्पर्ट , जो त्याच्या कामात तरबेज आहे आणि जो कंपनी करिता कायम फायदा करून देणारा आहे तो आपल्याला सोडून जात आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी तो काम ही करणार नाही कारण त्याला ऑफिस staff ने दिलेला वाईट अनुभव , त्यामुळे तो निराश झाला आहे. उलट तो आवडती काम करत रहीला तर उत्साही राहील आणि स्वतः ची company ची ही प्रगती करेल ,
पण केवळ एक समजून सांगू शकत नाही आणि दुसरा समजून घेऊ शकत नाही.
काही वेळेस मात्र वारंवार तेच तेच अनुभव येत गेले , अनेक वेळा समोरच्याला समजून घेत आलो आणि तरी ही प्रत्येक वेळी तसेच वागणे असते. त्यात समजून घेतो म्हणजे त्याला / तिला गरज आहे अशीच भावना , attitude निर्माण होतो. जरी एखाद्याने समजून सांगून परत पुढे जायचे ठरविले तरी प्रत्येक वेळी त्याची आवड , निवड , सवड यातून भेट असेल किंवा आपल्याला भेटण्यासाठी , बोलण्यासाठी वेळ नाही पण तो च वेळ इतरांना मात्र सहज आणि आनंदाने देत असेल आणि प्रत्येक वेळी सांगून, बोलून , भांडून ही तो समजून घेत नसेल उलट तेच वागणे असेल तर मात्र आपण त्याला समजून सांगणे आणि समजून घेणे दोन्ही ही सोडून देतो. आणि त्याची स्पेस त्याला देतो. कायमचे दुरावतो.
” वोह इंसान कभी भी आपकी value नहीं समझ सकता जीस के लिये आप हमेशा available है !
जब सोच मैं मोच आती है रिष्तो मैं खरोच आती है !!
आपल्या आयुष्यात समजून घेणारे आणि समजून सांगणारे आपलेच असतात आणि ते फार थोडे म्हणजे बोटांवर मोजण्याइतके असतात.. जिथे समजून सांगणारा आहे तिथे कधी तरी समजून घ्यावे. निदान काही तरी आपलेपणाने सांगतो आहे याचा विचार करावा. कधी आपल्याला , मनाला , विचार यांना मेंटल ब्लॉक येत असतो. आणि अशा वेळी इतर कोणी सांगते ते निदान ऐकावे. कधी समोरच्याला आपल्या असण्याने किंवा नसण्याने ही फरक पडत नाही. तेव्हा मात्र त्यांना काही सांगून ही समजत नाही अशावेळी शांत राहावे.
अनेकदा असे होते की काही बोलायचे आहे पण बोलणार नाही.
आयुष्य सुंदर आहे. एकमेकांना समजून घेण्यात आणि समजून वागण्यात आपलेपणा आहे. एकमेकांची काळजी आहे. ओढ आहे. आपल्यातला ओलेपणा टिकवा.
फक्त प्रेम करून चालत नाही तर ते टिकविणे महत्वाचे असते. त्यात प्रेम , काळजी , विश्वास , आपलेपणा , सुख , दुःख , राग , खुशी तर कधी jealousy ही गरजेची असते जी relationship टिकवून ठेवत असते.
एक समजून सांगू शकत नाही helpless असतो , आणि दुसरा समजून घेऊ शकत नसेल, त्याला पाहिजे तसेच समजून घेत असेल , प्रत्येकवेळी तसेच असेल तर थोडा ब्रेक घ्या. दोघंही विचार करा.वेळ द्या. संधी द्या.शांत रहा. सारासार विचार करा. भावना ओसरल्या की सगळे शांत होते.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!