Skip to content

इतरांनी आपल्याला समजून घ्यावं ही लिमिट आपण क्रॉस करतोय का..?

इतरांनी आपल्याला समजून घ्यावं ही लिमिट आपण क्रॉस करतोय का..?


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


इतरांनी आपल्याला समजून घ्यावं ही लिमिट आपण क्रॉस करतोय का..?…..वाह् वाह…!! खरच हा किती विचार करण्यासारखा प्रश्न आहे.नुसतं विचार नाही तर अगदी खोलात जाऊन यावर विचार करण आवश्यक आहे. समजून घेणं , समजून सांगणं इतकं अडकून गेलोय आपण सगळे यामध्ये की खरच कधीकधी अगदी नकोनको वाटतं.आयुष्यात नाना तऱ्हेच्या व्यक्ती असतात आणि त्यापैकीच आपणसुद्धा एक असतो.

आपल्यासारखच प्रत्येकजण इथे वेगळा आहे.प्रत्येकाचा स्वभाव वेगळा ,जगण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. आता स्वभाव पहायचा झाला तर इथे कुणी स्वार्थी , निस्वार्थी , समजूतदार , प्रेमळ ,मायाळू , कपटी अशा अनेक प्रकारचे स्वभाव आपण पाहतो.इतकच नाही तर आपण इतरांकडूनही तशीच अपेक्षा करत असतो.या पृथ्वीवरचा हर एक माणूस समजूतदार असतोच असं नाही.

या जगात अशीही काही माणसं आहेत जी की नेहमी इतरांकडूनच समजून घेण्याची अपेक्षा करतात. त्यांना नेहमी वाटतं इतरांनी आपल्याशी नीट वागावं ,आपल्याला समजून घ्यावं.पण स्वतः मात्र कधी ते इतरांना समजून घेत नाही. कितीही भांडणं झाली ,गैरसमज झाले तरी समोरच्यानेच समजून घ्यायचं असं त्यांना वाटत असतं.मी चुकलो तरी समोरच्याने माझ्या चुका पोटात घेऊन मला समजून घेऊन मला सुधारण्याची एक नाही तर अनेक संधी उपलब्ध करून द्याव्यात अशी त्यांची अपेक्षा , इच्छा असते.

म्हणजे प्रत्येक वेळी समोरच्याने नमतं घ्यावं , त्याला मला समजून घेता येत नाही का…? त्याने मला समजून घेतलं तर काही बिघडतं का…? असा विचार करणारे आपण अनेकदा पाहतो.सगळेजण असे असतात असं म्हणण बरोबर नाही कारण काही नात्यात काही ठिकाणी कितीतरीजणं खरच अगदी प्रत्येकवेळी समोरच्याला समजून घेतात , समजून सांगतात. समोरच्याने कितीही त्रास देऊदे , किंवा अपमान करूदे तरी ही काही समजूतदार माणसं मात्र त्या समोरच्या व्यक्तीला अगदी मनापासून समजून घेतात , सगळा राग-रूसवा विसरून थोडा समजूतदारपणा दाखवतात.

पण अशावेळी ती समजून न घेणारी , आणि इतरांकडूनच समजून घेण्याची अपेक्षा करणारी माणस त्यांची “इतरांनी समजून घ्यावं” ही मर्यादा ओलांडत असतात.हे त्यांच्या लक्षातच येत नाही की , ते जाणून बुजून तसं करतात हेच नेमकं कळत नाही. असं आपल्याही बाबतीत होत नाही नं….???? आपणसुद्धा असेच करतो का..? इतरांनी आपल्याला समजून घ्यावं ही लिमिट आपणसुद्धा ओलांडतो का…?किंवा आपण ती मर्यादा ओलांडली आहे का…?सतत दुसऱ्याने आपल्याला समजून घ्यावं असं वाटतं का…?

पहा..नीट विचार करा…तुमच्या बाबतीतही असं होत असेल तर वेळीच स्वतःच्या या गोष्टीला लगाम घालायला सुरुवात करा.कारण सतत इतरांनी आपल्याला समजून घेणं म्हणजे अगदी चुकीचं आहे. “उस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये” असं म्हणतात. पण काही माणसं आपल्याला समजून घेतायेत तर ते नेहमीच आपल्याला समजून घेतील असं म्हणून सतत स्वतःच्या चुकांवर किंवा नको त्या गोष्टींवर आपण पांघरून घालून मोकळे होतो.”अरे यार…,तु घेशील न समजून….” , “तु घेशील समजून यात काही शंकाच नाही , आणि तुला समजून घ्यायलाच हवं…वगैरे वगैरे शब्दांच्या चिमटीत इतरांना आपण पकडून ठेवतो.

शोभतं का हो हे स्वतःच्या मनाला…..? आणि सतत इतरांनी समजून का घ्यायच…? आपण कधी समजून घ्यायला शिकणार….?
सांगायची गोष्ट इतकीच की , स्वतःची अशी ही लिमिट ओलांडू नका.कधीतरी स्वतःसुद्धा इतरांना समजून घ्यायला शिका. नेहमीच इतरांनी आपल्याला समजून घ्यावं हा हट्ट न बाळगता आपण थोडं त्यांना समजून घ्यावं.

मान्य आहे की , प्रत्येकाला वाटत असतं की समोरच्याने आपल्याला थोडं समजून घ्यावं…पण मग तो समजून घेतोय म्हणून प्रत्येकवेळी त्यानेच समजून घेणं गरजेचं आहे का…?? अशाने आपण आपलीच लिमिट क्रॉस करतो.आणि मग कदाचित समोरच्याला असह्य होऊन तोही समजून घेण्याच्या मनःस्थितीत राहत नाही. त्याला कुणीतरी समजून घेण्याची तेव्हा नितांत आवश्यकता असते.

म्हणून कधीतरी तुम्ही समजून घ्या , कधीतरी ते समजून घेतील..आणि असा दोघांनी समजूतदारपणा दाखवला तर कोणी कोणती लिमिटही ओलांडणार नाही.मुळातच नात्यातील समजूतदारपणा , समज ही अमर्याद असावी पण गैरसमज , असमजूतदारपणा हा मात्र मर्यादित असावा.कारण यांनी जर मर्यादा ओलांडल्या तर नातीसुद्धा अगदी “लिमिटेड स्टॉक” ची लेबल लावून फिरतील.म्हणून समजून उमजून घ्यायला शिका…..

सुलझेंगे नहीं तो उलझेंगे कैसें….?? बस् सुलझनेकी कोशिश करो…बाकी जिंदगी का पानी बहता रहेगा….हर पल , हर लम्हा…..!!

 


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!