Skip to content

मुलांचं करीअर कॉउन्सिलिंग – भाग २०

राकेश वरपे

(मानसोपचार तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


मुलांचं करीअर कॉउन्सिलिंग – भाग २०


घरात एकूण ४ भावंडं एकत्र राहतात. मी जेव्हा घरात प्रवेश केला तेव्हा दोन भाऊ टीव्हीवर एक विनोदी चित्रपट पाहत होते आणि जोरजोरात हसत होते. मी आत शिरल्यानंतर केवळ चित्रपट सुरू राहिला आणि हसणं बंद. मनातल्या मनात वाटलं की एका हास्यकल्लोळ वातावरणाला आपण कुठेतरी छेद देतोय की काय !!!

३ महिन्याअगोदर डोंबिवलीला एका घरी जाण्याचा योग आला. त्या मॅडमने मुलीच्या कॉउन्सिलिंगसाठी बोलावले होते. आणि त्यांच्याकडूनच याठिकाणी जाण्याचा संदर्भ मिळाला. एकूण ४ भावंडांच्या करीअर कॉउन्सिलिंगसाठी बोलावनं आलं. त्यामध्ये २ भाऊ आणि २ बहिणी होत्या.

कोणताही खाजगी क्लास न लावता दोघीही भावांनी दहावीचं शैक्षणिक वर्ष पूर्ण केलं आणि जिंकलंही ! ते सुद्धा ७० टक्यांपेक्षा पुढे. त्या दोघांची ही बाब फार उल्लेखनीय वाटते.

फक्त गरज होती, त्या मिळवलेल्या गुणांना योग्य वाट दाखवण्याची, म्हणजेच योग्य करीअर दिशेची. मला सांगायला आवडेल की या दोघीही भावांची बुद्धिमत्ता (IQ) हा ‘Genius’ या कॅटेगरीत आली. त्यांच्या आलेल्या या बुद्धिमत्तेचा नेमका अर्थ त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. माझ्या आत्तापर्यंतच्या अख्या करीअरमध्ये इतकी शार्प, फोकस, बोलण्यातील नेमकेपणा असलेली मुलं ही पहिलीच.

म्हणून अत्यंत जाणीवपूर्वक त्यांच्यासोबत मी एक फोटो घेतला आणि तो मोह सुद्धा मला आवरता आला नाही.

खरंतर अशा मुलांना खाजगी क्लासेसची अजिबात आवश्यकता नसते. त्यांचा मेंदू आणि बुद्धिमत्ता ही निसर्गाकडून मिळालेली एक देणगी असते. फक्त गरज असते योग्य वाट दाखवणाऱ्या एका वाटाड्याची.

सर्वांना पुढची आप-आपली ध्येय-धोरणे स्पष्ट केली. मेडिटेशनचा भाग करवून घेतला आणि मुलांसाठी महत्वाचा निर्णय घेतल्याबद्दल मॅडमचे आभार मानले.

आणि अशा ‘Genius’ कुटुंबाची रजा घेतली.


शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला मुलांचं करीअर कॉउन्सिलिंग केल्यास वर्षभर पुढील अभ्यासाची दिशा ठरविण्यास मदत मिळते. आपल्यालाही आपल्या मुलांसाठी अशा पद्धतीचा निर्णय घ्यायचा असल्यास खालील प्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.

प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !

धन्यवाद !


क्लिक करून थेट व्हाट्सएपवर संपर्क करा !

९१७५४२९००६ / ९१३७३००९२९


करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

आपल्या मुलांच्या नावनोंदणीसाठी !
क्लिक करा !

करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ? वाचा !
क्लिक करा !

————————————————————————-

7 thoughts on “मुलांचं करीअर कॉउन्सिलिंग – भाग २०”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!