Skip to content

मुलांचं करीअर काउंन्सिलिंग – भाग ७

राकेश वरपे
(करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


मुलांचं करीअर काउंन्सिलिंग – भाग ७


कधी कधी २ पिढ्या जर घरी नांदत असतील तर अक्षरशः मुलांचा गोंधळ वाढतो. कारण आजी-आजोबा यांच्या काळातलं मुलांचं संगोपन आणि सध्याचं आई-बाबा यांच्या काळातलं मुलांचं संगोपन यांच्यात साखरेदार संघर्ष होऊन त्याचा अतिरीक्त ताण हा मुलांच्या शैक्षणिक व करिअर जीवनावर होतो. आई-बाबा जे सांगत आहेत ते फार महत्वाचे आहे, परंतु आजी-आजोबा जे सांगत आहेत ते त्याहूनही फार महत्वाचे आहे. अशा तारेवरच्या कसरतीत मुलांना आपले लहानपण सरकवावे लागते. जे मुलांच्या बौद्धिक खतपाणीला फार मोठा अडथळा आहे.
आई-बाबा किंवा आजी-आजोबा हे मुलांचं संगोपन उत्तम रीत्या कसं होईल याचाच सदैव प्रयत्न करीत असतात, याबद्दल तीळमात्र शंका नाही. परंतु जर एकच विषय शाळेतले शिक्षक वेगळ्या अंगाने शिकवणार आणि तोच विषय क्लासचे शिक्षक वेगळ्या अंगाने शिकवणार, तर यामध्ये मुलांचा गोंधळ वाढणारच. म्हणून जे अवघड-तिचकट विषय आहेत, शाळेतले आणि आयुष्याचे सुद्धा, त्याकडेच जर विशेष भर दिला तर ??? याठिकाणी दोन्हीही पिढ्यांनी आपलं एकमत बनवून ते मुलांसमोर मांडण्याची आवश्यकता आहे.
Career Counseling संबंधित महत्वपूर्ण चाचण्या घेतल्या, आलेला रिपोर्ट अत्यंत नम्रपणे दोन्हीही पिढ्यांसमोर ठेवला. त्यातला मतितार्थ सांगून एक दोन पिढ्यांना विश्वसनीय ठरेल अशी सुयोग्य दिशा ठरवली गेली. याठिकाणी काही मतं ही परखडपणे दोन्हीही पिढ्यांसमोर मांडावी लागतात, ती मांडली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून समाधानही वाटले.
जवळच्या लोकांकडून मिळालेल्या उपदेशातून मुलं ही केवळ तातपूर्तीच घडत असतात, खरी घडण्याची – विकासाची प्रक्रीया जवळीक लोकांच्या वागण्यातुनच होते.
एक महत्त्वाचं सांगायचंच राहीलं, चित्रफितीमध्ये मागची जी भिंत आपल्या सर्वांना रंगवलेली दिसत आहे ती आई, मुलगा आणि मुलीची कला आहे. मुद्दामहून तेथेच चित्रफीत घेण्याचा हट्टाहास माझ्याकडून झाला.☺️☺️।
या आणि समूहात असणाऱ्या अशा सर्व कुटुंबांना पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा !
नवीन अनुभवासोबत पुन्हा भेटूया !
■ अधिक माहीतीसाठी
करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ माझ्या आवाजात ऐका !
***
आपल्या मुलांच्या नावनोंदणीसाठी !
करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ?
————————————————————————-

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!