Skip to content

“आनंद” ही एक सुंदर मानसिक अवस्था आहे!!

आनंद…..


सौ.सुधा पाटील


आनंद! एक सुंदर मानसिक अवस्था आहे.आनंद म्हणजे जणू निरभ्र आकाश, मनाला मनसोक्त बागडू देणार! आनंद सर्व मानव प्राण्यांची गरज असते.आनंदाशिवाय हे आयुष्य म्हणजे जणू सुरांशिवाय संगीतच! आनंद म्हणजे जीवनाला सजवणारा जणू पारिजातकचं! आनंद हा जीवन संजीवनी असतो.जीवनाला मोरपीसी क्षणांनी सजवतो तो आनंदच! म्हणूनच प्रत्येक क्षणात लपलेला आनंद शोधता यायला हवा.

आनंद ही एक मानसिक संकल्पना आहे.ती समजून घेऊन जगता यायला हवं.निसर्ग जणू आनंदाचा अफाट असा खजिना आहे.तो सर्वांसाठी मोफत उधळला जातो.पण आपण मात्र निर्जीव वस्तूंत आनंद शोधत राहतो.महागड्या वस्तू म्हणजे आनंद नाही.अति पैसा कमावणं म्हणजे आनंद नाही.पण शेवटी आनंद हा वैयक्तिक असतो.कोणाला कशात आनंद लाभेल हे सांगता येत नाही.

आनंद हा सकृत आणि विकृत असू शकतो.जो आनंद इतरांना इजा न करता असतो तो सकृत आनंद! आणि इतरांना इजा करून मिळतो तो विकृत आनंद!पण विकृत आनंद ही एक मानसिक विकृती असते.जी मानवी मूल्यांची पायमल्ली करते.म्हणूनच आनंद ही संकल्पना समजून घेणं गरजेचं असतं.आनंद हा चराचरात भरलेला आहे.

अगदी झाडं,वेली,पक्षी,वारा, पाऊस, डोंगर,नदी नाले,सागर ही निसर्गाची रुपं आपणास वेड लावतात.आणि निखळ आनंद देऊन आपणास मंत्रमुग्ध करतात.ज्याला हा आनंद शोधता येतो तो कधीच कृत्रिम आनंद शोधत बसत नाही.तो सजीव आनंद भरभरून उपभोगतो आणि आयुष्य टवटवीत ठेवतो.

खरं तर आनंद कोणी कोणाला देऊ शकत नाही.कोणाचा आनंद कोणावरही अवलंबून नसतो.आपला आनंद आपणचं शोधायचा आणि उपभोगायचा असतो.जेव्हा माणूस आपला आनंद इतरांमध्ये शोधत राहतो तेव्हा त्यास तो कधीच मिळतं नाही.कारण जगातील प्रत्येक व्यक्ती भिन्न असते.त्याचे विचार भिन्न असतात.जगण्याची मूल्ये भिन्न असतात.म्हणूनच आपला आनंद आपणचं शोधायचा असतो.तरच खरं आयुष्य जगता येतं.परावलंबी आयुष्य कधीच खरा आनंद देत नाही.तुमचा आनंद तुमच्या आत असतो.आनंदाला पैसा लागतं नाही.तो मनात जन्माला यावा लागतो.

म्हणूनच क्षणभंगुर आयुष्यात क्षणाक्षणात लपलेला आनंद शोधा आणि मस्त जीवन जगा.कारण मित्रांची संगत, निरर्थक भटकंती, सुंदर फूल,वारा, पाऊस, जुन्या आठवणी या गोष्टी विनामूल्य अनमोल असा आनंद देऊन जातात.म्हणूनच आपला आनंद आपणचं शोधायचा आणि आनंदी रहायचं.कारण आनंदी मनंच सदैव जीवंत असतं.

आनंदाशिवाय जगणं म्हणजे जणू सजीव देहात मृत मनाचं वावरणं!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!