Skip to content

या सुंदर मानव जन्माचा सांभाळ करायला पाहिजे!!

आजारी असताना लागणारा शोध?


ज्योत्स्ना शिंपी


मला खात्री आहे की बरीच मंडळी माझ्याशी सहमत होतील…

आपणा सर्वांनाच निरोगी, सुदृढ, स्वस्थ राहायला आवडते आणि त्या अनुषंगाने आपण प्रयत्नही करत असतो पण तरी यदाकदाचित क्लायमेट, वातावरण बदल, इतर ताणतणाव वा अजून काही कारणामुळे जर क्वचित आपण आजारी पडलो तर आपल्याला बऱ्याच गोष्टींचा नव्याने शोध लागतो… असं नाही की त्या आपल्याला आधी माहीत नसतात ….पण आपणास त्याचे महत्त्व नव्याने कळते… जसे की आजारी असल्यावर आपल्याला कळते की साधा ब्रश करायला पण केवढी ऊर्जा,ताकद लागते… आपण रोज किती कामे जलद, रोजच्या सवयीने नकळत करत असतो आणि त्यामध्ये आपल्याला खूपशी ऊर्जा ताकद लागत असते नि त्याचा आपणास अंदाज सुद्धा येत नाही…

आपल्याला शारीरिक आरोग्याचे महत्व, शारीरिक संपत्ती किती महत्वाची आहे हे आजारी पडल्यावर, बरे नसल्यावर जाणीवपूर्वक जाणवते. जर तुम्ही शरीराने निरोगी, स्वस्थ, सुदृढ असाल तर तुम्ही जगातली कुठलीही संपत्ती मिळवू शकता, पण रोजच्या गतिमान जीवनात इतर संपत्ती मिळवण्यात आपण शारीरिक संपत्तीकडे थोड्या फार अंतराने दुर्लक्ष करतो किंवा होते.. आपल्याला आपल्या शरीराचे कार्य किती चांगल्या रीतीने अविरत चालत असते या अद्भुतेचा साक्षात्कार होतो.

आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जाणवते की आयुष्यात प्रेम आणि प्रेमळ व्यक्ती किती महत्त्वाच्या आहे कारण आजारपणात लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रेम आणि आपल्या व्यक्तींनी केलेली प्रेमळ सेवा आणि विचारपूस आपणास लवकरात लवकर बरं होण्यास भरपूर ऊर्जा आणि उभारी देते…

तर या दोन महत्त्वाच्या बाबींचा शोध आपणास कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर लागतो जो आपणास विचार करण्यास प्रवृत्त करतो की शारीरिक सम्पत्ति आणि प्रेम आणि प्रेमळ व्यक्ती चे आपल्या आयुष्यात असलेले महत्त्वाचे स्थान…

पण म्हणतात ना संपत्ती ही मिळवावी लागते आणि टिकवावी लागते… तर आपणास हा सुंदर मानव जन्म मिळालेला आहे तर त्याचा आपण नीट सांभाळ केला पाहिजे. सकस आहार, विहार, सकारात्मक विचार या गोष्टी आपल्या शारीरिक संपत्तीत वाढच करत राहतात… आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रेम आणि आपल्या आयुष्यातील प्रेमळ व्यक्ती… तर ते बहुतांशी आपल्या स्वभावावर आणि दृष्टिकोनावर अवलंबून असते… जे आपण देणार तेच आपल्याकडे खूप पटीने परत येणार हा सृष्टीचा नियमच आहे.. तर प्रेम, आदर सन्मान दिल्याने आपण आपल्या जीवनात या गोष्टी आपसूकच आकर्षित करतो आणि त्याचा उपयोग आपल्याला योग्य वेळी नक्कीच होतो…

मला बऱ्याच वेळा असेही वाटते की स्त्रीने कधी आजारी पडूच नये,पण मला कल्पना आहे की असे अशक्य आहे कारण शरीर हे एक यंत्र आहे आहे आणि तेही बिघडू शकतो आणि त्यालाही आरामाची गरज भासू शकते…

तर मला असे वाटण्याचे कारण म्हणजे की घरातली स्त्री जर आजारी पडली तर ती एकटी आजारी पडत नाही तर त्यासोबत पूर्ण कुटुंब, घर ही आजारी पडते… बऱ्याचदा अशा वेळी नवरा वा घरातील पुरुष मंडळी घरातील कामे करताना बघून स्त्रीला वाईट वाटते आणि उगीचच तिच्या मनात अपराधीपणाची भावना ही निर्माण होते…एक-दोन दिवसच घरातील मंडळी उत्साहाने घरकामात मदत करू शकतात, यात त्यांचाही दोष नाही त्यांना या गोष्टीची कधी सवय असते पण आजारपण आणि या सगळ्या गोष्टी यामुळे त्या आजारी स्त्रीची अजूनच चिडचिड वाढते…

यासाठीच प्रत्येकी स्त्रीने कुटुंबातील सर्वांना स्वावलंबी बनवणे, थोड्याफार प्रमाणात सर्वांना शिस्त आणि वेळेचे नियोजन अंगीकारायला शिकवणे खूप महत्वाचे आहे….

आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वांनी आजारपण हे सकारात्मकतेने स्वीकारायला शिकायला पाहिजे…. आपल्याला अनायसे मिळालेला विश्रांतीचा काळ समजायला हवा… खरं तर जीवनात पुढे जाण्यासाठी विराम घेणेही खूप गरजेचे असते… जसे कुठलेही यंत्र आपण सतत न चालवता त्याला पुरेशी विश्रांती देतो आणि वेळोवेळी रिपेअर आणि मेंटेनन्सही करतो… त्याच प्रमाणे आपणही पुढे जाण्यासाठी हा विराम घेत आहोत ही मानसिकता आपणास खूप ऊर्जा आणि उभारी देऊन जाते… याकाळात भरपूर विश्रांती घ्या, सकस आहारावर भर द्या, सकारात्मक पुस्तके वाचा, चांगले संगीत ऐका, कॉमेडी शोज पहा…आपल्या जवळच्या प्रिय मित्र-मैत्रिणींशी, नातेवाईकांशी फोनवरून संवाद साधत रहा…

या सर्व गोष्टींमुळे हा कठीण काळ सुद्धा एकमेकांच्या सहकार्याने आणि सोबतीने आनंदाने पार पडेल आणि नवीन ऊर्जा, उभारी सोबत तुम्ही कणखरपणे उभे राहाल…

आपणा सर्वांना निरोगी, सुदृढ स्वस्थ आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!