Skip to content

येणाऱ्या अडचणी बरेचदा चिंतांमधून येतात..

सातत्य आणि जीवन


श्रीकांत कुलांगे
9890420209

वेबसाईट


प्रतीक बऱ्याचदा सांगुन सुध्दा तो अभ्यासात किंवा इतर ठरवलेल्या गोष्टीत सातत्य ठेवत नव्हता म्हणून आईची तक्रार होती. व त्यामुळे प्रतिकला रोजच्या व्यवहारात सांगितलेले काम करण्यास वेळ लागत होता. असा अनुभव फक्त प्रतिकचा नसून अनेकांचा आहे. असं का होत की ठरवून फक्त सुरुवातीच्या काही दिवस ठेवलेले सातत्य नंतर ढेपाळून जाते. काही कारणे आहेत, जसे की,

१. आपण प्रक्रियेऐवजी निकालावर लक्ष केंद्रित करतो- प्रोसेसला वेळ लागतो, त्यामध्ये प्रत्येक स्टेप महत्वाची असते. या प्रक्रियेत शॉर्टकट नको.

२. अयोग्य प्लानिंग- लक्ष्य प्राप्ती करिता योजना चांगली नसेल तर कंटाळा येतो.

३. वातावरणाचा परिणाम- सभोवतालचे वातावरण जर नकारात्मक असेल तर भावना बदलून आत्मविश्वास गायब होतो.

४. मन विचलित होणे-एकाच वेळी अनेक काम ठरविल्यास वेळेचे नियोजन होत नाही.

५. मानसिक शांती भंग होणे- कित्येकदा तणाव, चिंता व उदासिनता आपल्याला काही करू देत नाही. उत्साह नाहीसा होतो.

६. आर्थिक किंवा कौटुंबिक समस्या.

७. काही शारीरिक किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे सातत्य टिकत नाही.

वरील करणे संयुक्तिक आहेत. प्रत्येक व्यक्तीला ध्येय गाठण्यासाठी स्वतःहून काळजी घेणे गरजेचे असते. त्यासाठी प्रक्रिया कुठे चुकते का याचे विश्लेषण करून पुढील वाटचाल सुरू ठेवली पाहिजे. त्यासाठी सातत्य राखण्यासाठी काही प्रयत्न केले तर फायदा होईल.

१. मानसिकता तयार करणे अपेक्षित आहे. ज्या गोष्टी करायच्या त्याबाबत येणारे अडथळे अगोदर लिहून ठेवले तर मानसिकता सकारात्मक राहते.

२. विचलीत करणाऱ्या व्यक्तीला दूर ठेवले तर ठरलेले काम त्या वेळात होते.

३. वेळापत्रक करताना अगोदर सर्व माहिती घेऊन मगच ठरवा. सातत्य कायम राहील असेच पत्रक असावे.

४. प्रत्येक वेळेस मोटीवेशन राहील असे नाही. मेडीटेशन किंवा चांगल्या माणसांच्या संगतीमधून नेहमी प्रेरणा मिळते.

५. अलार्म न लवाता उठण्याची अगोदर सवय लाऊन नंतर प्रयत्न छान मदत करते.

६. रुटीन गोष्टींचे व्यवस्थित नियोजन.

७. शेवटी जे आपण ठरवले ते चांगल्यासाठी म्हणुन सातत्य कायम राहणार हा निर्धार महत्त्वाचा.

सातत्य राखण्यासाठी मानसिक तयारी महत्वाची. येणाऱ्या अडचणी बऱ्याचदा चिंतांमधून येतात. त्यासाठी नित्यक्रम नेहमी ऑडिट करायला हवे. असे केल्यास सातत्य टिकते.

घरातील एखादी व्यक्ती यामध्ये मदत करू शकते जी तुमची प्रेरणा असू शकते.

सातत्य असल्यास आयुष्यात यशस्वी होणे शक्य होते. मग यश प्राप्तीसाठी आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो. स्वतःवर विश्वास व सबूरी चे फळ नक्कीच चांगले असते.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!