Skip to content

निराश होऊन जगण्यापेक्षा आशावादी होऊन जगुया….!!

निराश होऊन जगण्यापेक्षा आशावादी होऊन जगुया….!!


विद्या जाधेकर


कधीकधी अगदीच मनाची घालमेल होते. प्रत्यक्ष टेन्शन दिसत नसले तरी अप्रत्यक्ष रीत्या ते जाणवत राहाते. कदाचित काही मनासारखे न घडल्याने किंवा अनेक इच्छा मनात दाबून राहील्याने होत असावे……

अश्यावेळी मोटीवेशनल लेक्चर्स, मेडीटेशन उपयोगी पडु शकेल.. पण त्याचबरोबर मनाला सतत सांगत राहिले पाहिजे की एक ना एक वेळ अशी नक्की आहे जेव्हा आपल्याला सर्व काही मिळणार आहे. आपण मनापासून इच्छीलेल्या गोष्टी पुर्ण होणार आहे़.कदाचित आज पुर्ण होउ न शकलेली गोष्ट उद्या अधिक चांगल्या प्रकारे होणार असावि…..आणि हे सर्व मिळताना,होताना बघण्यासाठी आपल न हारता न झुरता जगण गरजेचे आहे.

आजकाल तणावाचा सामना करणे कधी कधी कठीण होऊन बसते. आजुबाजूला असलेले वातवरण, घडणाऱ्या गोष्टी यांच्या प्रभावाने तणावात भर पडु शकते. अशावेळी आपण चांगले विचार ऐकण्यावर, वाचनावर लक्ष केंद्रित करू शकतो. आपल्या मनातील घालमेल एखाद्या वहीत उतरवू शकलो तर ते लिहीतानाच अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळत जातात.

मानवी स्वभावानुसार आजच्या स्पर्धेच्या युगात इर्षा, द्वेष, घृणा यातून प्रत्येक जण जात असतो. यामध्येही आपले आशावादी असण मदत करते. जसा रात्री नंतर दिवस येणार त्याप्रमाणे वाईट दिवस सरून चांगले दिवस येणारच आहे…असा विचार करू शकलो तर कदाचित आयुष्यात येणारी छोटीमोठी आव्हान खेळ समजून सहजपणे खेळू शकतो आणि ताणतणाव दूर करू शकतो.

निराश होऊन हारण्यापेक्षा आशावादी राहुन आनंदी जीवन जगुया।।



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!