Skip to content

प्रार्थनेद्वारे आपण आपली समस्या किंवा अडचण सोडवू शकतो!

प्रार्थनेची अफाट शक्ती


ज्योत्स्ना शिंपी


प्रार्थना शक्ती तसेच परिणामकारक प्रार्थना पद्धती द्वारे आपण आपली समस्या किंवा अडचण सोडवू शकतो.

परिणामकारक प्रार्थना तंत्राचा अवलंब केला की योग्य वेळी समस्येचे उत्तर सापडते. नेहमीच चांगले परिणाम मिळवण्यासाठी सकारात्मक प्रार्थना करण्यावर विश्वास ठेवला पाहिजे. जर तुम्ही प्रार्थना केली तर प्रत्येक समस्या सोडवता येते आणि योग्य रीतीने सोडवता येते.

दररोज रात्री केलेल्या प्रार्थनेमुळे तुम्ही ताजेतवाने होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी नव्या जोमाने कामाला लागू शकतात. प्रार्थना करीत असताना तुम्ही ज्या गोष्टी मागत आहात त्या तुम्हाला मिळाल्या आहेत यावर विश्वास ठेवावा म्हणजे त्या तुम्हाला नक्कीच मिळतील.

प्रार्थनेच्या शक्तीद्वारे समस्या सोडवण्यासाठी आणि अडचणी दूर करण्यासाठी साधी आणि सोपी पद्धत तीन भागात विभागली जाते… पहिली प्रार्थांनांकन, दुसरी चित्रांकन, आणि तिसरी म्हणजे वास्तवांकन.

प्रार्थनांकन म्हणजे दररोज सर्जनशील प्रार्थना करायची पद्धत. जेव्हा एखादी समस्या उद्भवते तेव्हा प्रार्थनेतून देवाशी सरळ सरळ आणि साधा संवाद साधणे. शिवाय देव म्हणजे कोणी तरी अतिदूर असलेले एखादे धूसर अस्तित्व असे न मानता देवाला एक जोडीदार, जवळची व्यक्ती समजणे जी सदैव आपल्या सोबत घरात, कार्यालयात, रस्त्यावर, गाडीत आपल्या अवतीभोवती असते. न थांबता प्रार्थना करीत राहणे. अविरत प्रार्थना करायची म्हणजे जो प्रश्न निर्णय घेऊन सोडवायचा आहे त्या बाबत दररोज देवाशी सहज, साधारण पद्धतीने चर्चा करायची आणि शेवटी देवाच्या उपस्थितीने आपले दैनंदिन जीवन प्रार्थनांकित, प्रार्थनामय करून टाकणे.

चालताना, गाडी चालवताना रोजची नित्य कर्मे करतानाही प्रार्थना करणे. आपले दैनंदिन जीवन प्रार्थनेने भरून टाकणे. म्हणजेच प्रार्थना जणू आपले जीवन, आपल्या श्वास बनवणे… देवाला आपला जिवलग सखा मानून, “देवा, या बाबतीत मी काय करू?” किंवा “देवा, या गोष्टीतील मेख मला कळू दे.” असे विचारणे… मनाला प्रार्थनांकित करून सगळ्या कार्यांना प्रार्थनामय बनवून टाकणे.

या परिणाम कारक प्रार्थनेतील दुसरा भाग म्हणजे चित्रांकन…मानसशास्त्रातील मूलभूत घटक आहे इच्छापूर्ती. जो माणूस यश गृहीत धरतो त्याला आधी यश मिळते. जे अपयश गृहीत धरतात, त्यांच्या वाट्याला अपयश येते. जेव्हा यशाचे वा अपयशाचे मानसिक चित्र रंगवले जाते तेव्हा ते वास्तवात खरे होते. वास्तविकता त्या चित्राचे तंतोतंत रूप धारण करते. तुमच्या मनासमोर असे चित्र उभे करा की तुम्हाला हवे आहे ते घडले आहे. ते चित्र तुमच्या चेतनेत दृढ करा.

हे चित्र ईश्वराचा इच्छेला समर्पित करीत राहा… म्हणजे ती गोष्ट ईश्वरावर सोडून द्या…. आणि त्याच्या मार्गदर्शनानुसार वागा. बुद्धी वापरून कठोर कष्ट करा. असे करून याबाबत यश मिळावे म्हणून तुमच्या वाट्याचे काम पूर्ण करा. श्रद्धा बाळगत ते चित्रांकन तुमच्या विचारात घट्टपणे रुजवा.

असे करा आणि ते चित्र कशा अनपेक्षित मार्गाने वास्तवात साकार झाले आहे हे पाहून तुमच्या आश्चर्याला पारावार राहणार नाही. अशा रीतीने त्या चित्राचे वस्तावांकन होईल. तुमच्या इच्छेबद्दल तुम्ही केलेल्या प्रार्थनांकनामुळे आणि चित्रांकनामुळे तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी ईश्वराच्या शक्तीला आवाहन केले आणि ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून स्वतःला सर्वस्वी वाहून घेतले तर ती इच्छा खरोखरच पूर्ण होते.

प्रार्थनेच्या या साध्या आणि सोप्या पद्धतीत प्रचंड शक्ती आहे आणि त्याचा वापर करून आपण आपल्यातील सर्जनशील सामर्थ्य मुक्त करण्याचा अनुभव घेऊ शकतो. आणि बरं का, प्रार्थना करताना नेहमीच काहीतरी मागणी करू नका, उलट ईश्वर त्याच्या कृपेचा आशीर्वाद देत आहे असे दृढपणे समजून त्याचे आभार मानण्यात जास्त वेळ घालवा…

तर मित्रांनो, या परिणामकारक प्रार्थना शक्तीचा वापर करून आपल्यातील अविश्वसनीय शक्तीचा शोध घ्या आणि प्रभावी परिणाम मिळवा….आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा ????



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!